Aspirant's Wisdom

Description
ढासळला जरी बुरुज आमचा
तरी निधड्या छातीची ढाल आहे
कारण वणवा पेटलाय आता
अन मीच सगळ्यांचा काळ आहे

Copyright ©निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

2 months, 1 week ago

🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा Final Answer Key आणि बरंच काही....*🚨* कालचा दिवस काहींसाठी आनंदाचा, तर काहींसाठी अपेक्षाभंगाचा असेल. ज्यांना अपेक्षित स्कोर आला नसेल, त्यांनी निराश होऊ नका! हे सांगणं सोपं आहे, पण पचवणं खूप कठीण. पण मित्रांनो, हीच ती परीक्षा आहे जिथे तुमची खरी कसोटी लागते. स्पर्धा परीक्षेचं मैदान म्हणजे रणांगण आहे, इथे लढाईत हरल्यावरच विजयी योद्धा घडतो!

यश आणि अपयश - दोन्ही सावरायला शिकवा:
ज्यांचा स्कोर चांगला आला आहे, त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की, आजचा विजय हा अंतिम नसतो. यशाचा आनंद साजरा करा, पण त्याला मनावर नको घेऊ. पुढच्या टप्प्यासाठी सज्ज व्हा. जो आता सावरतो आणि पुढे तयारीला लागतो, तोच खरा विजेता!

💔ज्यांचा स्कोर अपेक्षेप्रमाणे नाही:
तुम्हाला काय वाटतं, हा शेवट आहे का? नाही! ही तर फक्त सुरुवात आहे. गट ब आणि गट क या दोन संधी तुमच्यासमोर आहेत. गट क साठीचा विचार नंतर करा; सध्या गट ब वर फोकस करा. लक्षात ठेवा, गट ब चा निकाल राज्यसेवेच्या आधी लागणार आहे. म्हणजे काय? तुम्ही राज्यसेवेच्या मुलाखतीला जाणाऱ्यांपेक्षा आधी अधिकारी होऊ शकता!

ज्यांनी safe score मिळवला त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि मुख्यच्या तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा!💐
आणि ज्यांना आज अपेक्षित स्कोअर आला नाही, त्यांना सांगतो – तुम्ही लढाई हरला असाल, पण युद्ध अजून बाकी आहे.🏇
- क्रमशः

© निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने#mpsc#upsc#परीक्षा#आयुष्य

जॉईन👇**@AspirantsWisdom

2 months, 1 week ago

*🇮🇳*प्रजासत्ताक दिन: एक स्वप्नवत आठवण*🇮🇳* लहानपणी प्रजासत्ताक दिन म्हणजे आनंद, मस्ती आणि देशभक्तीचा दिवस असायचा!
सकाळ व्हायची ते "मेरे देश की धरती, हे मेरे वतन के लोगो " अशा सदाबहार गाण्यांनी...

सकाळी लवकर उठून शाळेच्या मैदानात ध्वजवंदनासाठी धावायचो. स्वच्छ युनिफॉर्म घालून, बूट चमकवून तिरंग्यासमोर उभं राहायचं कडक सॅल्युट ठोकायचा आणि अभिमानाने "जन गण मन" म्हणायचं. झेंडावंदन झालं की गोळ्या/चॉकलेट किंवा बिस्कीट मिळायचे, ते खाण्यासाठी वर्षभर वाट पाहिली जायची! नंतर संपूर्ण गावातून/शहरातून परेड निघायची त्यात आपल्या मित्राचा हात धरून सगळा गाव/शहर फिरून यायचं. रस्त्यात कोणी उदार दुकानदार/संस्था आम्हाला खाऊ वाटायचे. लई भारी वाटायचं राव. लहानपण देगा देवा म्हणतात ते उगीच नाही...आयुष्यातले खरेखुरे मंतरलेले दिवस होते*😍*❤️ आज हातात पैसे असले तरी ते वर्षभरातून एकदाच फुकट मिळालेले गोळ्या बिस्कीट अजून चविष्ट वाटते... त्याची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे...*😋* दुपारी टीव्हीवर परेड बघायचो – सैनिकांचे संचलन, रणगाडे, हवाई कसरती बघून अंगावर रोमांच यायचे. मग 'शहीद', 'क्रांती', 'बॉर्डर' 🪖*सारखे चित्रपट बघायचो आणि मनात देशभक्तीची लाट यायची.* 🫡 पण आता, MPSC/UPSC aspirants म्हणून आमची स्वप्नं मोठी झाली आहेत! आता शाळेच्या मैदानात नाही, तर खऱ्या अर्थाने देशसेवा करून प्रशासकीय अधिकारी म्हणून स्वतःच्या हाताने तिरंगा*🇮🇳* फडकवण्याची स्वप्नं पाहतोय! तो दिवस सर्वांच्या जीवनात लवकरच येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना*🙏*❤️ ©निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने**https://t.me/AspirantsWisdom

2 months, 1 week ago

**सोशल मीडिया वर तुमचे इतर क्षेत्रातील मित्र मंडळी मजा करताना (गाडी, बंगला, foreign trip, पार्ट्या, इत्यादी) पाहून वाईट वाटून घेऊ नका.

कारण**...

**“तुमची स्पर्धा परीक्षा करण्याची वाट सोपी कधीच नव्हती, पण तुमचं ध्येयही इतरांसारखं साधंसुधं नव्हतं.”

©निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने**

https://t.me/AspirantsWisdom

2 months, 1 week ago

तुम्हाला खाली खेचणारं प्रत्येक टोमणा म्हणजे तुमच्या उंचीची पोचपावती आहे. त्या अपमानाचं सोनं करा आणि स्वतःचं यश गगनभरारी घेण्यासाठी वापरा."

© मंतरलेल्या मनाची स्पंदने

2 months, 2 weeks ago

*✍️ स्पर्धा परीक्षा: संघर्ष आणि समर्पण... भाग 1*
स्पर्धा परीक्षेचा मार्ग हा मखमली फुलांनी सजलेला नसतो; त्यामागे असतो अथक परिश्रम, मानसिक ओढाताण, आणि सततच्या अपयशांची कडवट चव. बाहेरच्या जगाला दिसतो तो फक्त यशाचा परिणाम—निकाल, सत्काराचे सोहळे, पेढ्यांचे बॉक्स, पुष्पगुच्छ, आणि मिळणारा सन्मान. पण त्यामागे असलेला संघर्ष, समर्पण आणि तग धरून ठेवलेली जिद्द याचा कुणालाच थांग लागत नाही.

हा प्रवास सुरू होतो १२ वी नंतर. पदवी संपल्यावर, मुलगा/मुलगी तयारीला लागतो/लागते, आणि घरात आनंद पसरतो—सगळीकड सांगितलं जातं, “आता काही वर्षांतच आपला मुलगा अधिकारी (IAS /IPS,/DC/DySP) होणार!” सुरुवातीच्या काळात नातेवाईक, मित्रमंडळी, आणि गावकरीही त्याला पुढच्या अधिकारीपदावर बसल्याचं स्वप्न पाहतात. काही काळासाठी, त्याच्या आत्मविश्वासाला बळ मिळतं. पण जसजसा काळ जातो, आणि निकाल लागत नाही, तसतशी त्याच्यावरच्या अपेक्षांचं ओझं वाढत जातं.

तीन-चार वर्षं उलटली तरी यश मिळालं नाही, तेव्हा खरा संघर्ष उफाळून येतो. हा केवळ अभ्यासाचा संघर्ष नाही, तर मानसिक, सामाजिक, आणि वैयक्तिक आव्हानांचा मिळून बनलेला असतो. अपयशाच्या भीतीने तो मित्रांपासून, नातेवाईकांपासून दूर होऊ लागतो. गावाकडे जाणं, सण साजरे करणं, अगदी साधं घरात राहणंही कठीण होऊन जातं. "अजून अधिकारी नाही झालास?" हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी असतो आणि त्याला आतून पोखरून टाकतो.

खऱ्या संघर्षाची सुरुवात इथेच होते. बाहेरच्या जगाला त्याचा अंदाज येत नाही—तो एकटा पडतो, निराश होतो, वर्षानुवर्षं घरी न जाणारा बनतो. मनात विचारांचा पूर येतो, "परीक्षा सोडावी का? की शेवटपर्यंत प्रयत्न करावेत?" त्या प्रत्येक सणासुदीला तो घरी जायची आस धरतो, पण अपयशाची जखम मनात ठसठसत राहते. गावाला जाऊन "कलेक्टर साहेब आलेत का?" हे टोमणे ऐकायची त्याची तयारी नसते.

मुलींना तर आणखी अवघड; त्यांना केवळ १-२ वर्षांची परवानगी असते. घरचं आणि समाजाचं लग्नाचं ओझं त्यांच्यावर अधिकच असतं. म्हणून ती बिचारी पुण्यासारख्या शहरात एका खोलीत, साध्या कपड्यांत सण साजरे करतात. त्यांच्या मनातही तीच आशा—“पुढच्या वर्षी सण घरच्यांसोबत साजरा करू.” पण प्रत्येक वर्ष पुढे जातं, यश मात्र हाती येत नाही.

अशा काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व्यक्तीला सपोर्टची गरज असते, पण बहुतांश वेळा ती एकटीच उरते. तिचा संघर्ष ही केवळ अभ्यासाची लढाई नसते, तर स्वतःला स्वतःचा मित्र, आधार, आणि मार्गदर्शक बनवण्याची असते. स्वतःलाच धीर द्यावा लागतो, स्वतःचं मनोबल उंचावावं लागतं. या प्रवासात त्या व्यक्तीला आपल्या उणिवा बाजूला सारत पुढं जावं लागतं, जिथे कधी तरी यश हाती लागण्याची आशा असते.

आणि अखेर, जेव्हा यश मिळतं, तेव्हा परिस्थिती बदलते. तेच लोक, जे तयारीच्या काळात नीट बोलत नव्हते/टोमणे मारत होते, ते आता कौतुकाचं नाटक करत पुढे येतात, अनोळखी फोन येतात, सत्काराचे कार्यक्रम होतात. मात्र त्या कठीण काळात, संघर्षाच्या मार्गावर, कोणी एकदाही साधा फोन करून विचारत नाही.

? म्हणूनच, माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तयारीच्या काळात कोणीतरी पाठिंबा देईल या अपेक्षेने थांबू नका. स्वतःच स्वतःचा सर्वात मोठा समर्थक बना. या वाटेवर कित्येक अडथळे येणार, पण तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आणि एक दिवस सगळ्यांना दाखवून द्या की, "होय, मी अधिकारी झालो!" आणि तेव्हा बघा, किती लोकं तुमच्या पुढे पुढे करायला येतील तेव्हा त्यांना तेवढंच महत्त्व द्या जेवढं त्यांनी आपल्याला दिलं होतं....कारण आपल्याला माणूस म्हणून काहीच किंमत नसते...असते ती फक्त आपल्याकडे असणाऱ्या पद , संपत्ती आणि स्टेटस या गोष्टींना...

-क्रमशः

©निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने

#mpsc_upsc
दुनियादारी

जॉईन?
https://t.me/AspirantsWisdom

2 months, 2 weeks ago

उदास होने के लिए उम्र पड़ी है,_
नज़र उठाओ सामने ज़िंदगी खड़ी है,

अपनी हँसी को होंठों से न जाने देना!
क्योंकि हमारी मुस्कुराहट के पीछे दुनिया पडी है

#mpsc #upsc

@AspirantsWisdom

2 months, 2 weeks ago

"जेव्हा तुम्ही चांगल्या मनाच्या लोकांना दुखावता,"

ते ओरडत नाहीत, ते त्यांचा त्रास आतच ठेवतात. ते हळूहळू आणि शांतपणे तुमच्यापासून दूर जातील आणि परत येणार नाहीत. ते चांगले असणे थांबवणार नाहीत, पण ते तुम्हावर पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत. तेव्हाच तुम्ही त्यांना गमावलेले असता.

चांगल्या मनाचे लोक निष्ठा आणि दयाळूपणाला महत्त्व देतात, पण एकदा त्यांचा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणे जवळपास अशक्य असते. ते सूड घेत नाहीत किंवा मनात राग ठेवत नाहीत; त्याऐवजी, ते शांततेला प्राधान्य देतात आणि दूर जाण्याचा निर्णय घेतात. त्यांना गमावण्याचा मोठा आवाज होत नाही. पण त्यांच्या शांत अनुपस्थितीची जाणीव सर्वाधिक कानठळ्या बसवते.

© निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने

#mpsc #upsc

@AspirantsWisdom

2 months, 2 weeks ago

खरं आहे ना?

**"अच्छे समय पर मिठाई मांगने वाले लोग
बुरे समय पर फोन तक नहीं उठाते...!!"

दुनियादारी#mpsc_upsc जॉईन?**https://t.me/AspirantsWisdom

2 months, 3 weeks ago

**प्रिय विद्यार्थीमित्रांनो,

सर्वप्रथम, लक्षात ठेवा की परीक्षा हा तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे, पण तो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण सार नाही. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.

  1. आत्मविश्वास ठेवा: तुम्ही जे काही शिकले आहे, ते विसरणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा.

  2. आराम महत्वाचा आहे: सतत अभ्यासाच्या तणावाखाली राहू नका. थोडा वेळ शांत राहा, योगा किंवा ध्यान करा.

3.एकावेळी एक पाऊल: संपूर्ण अभ्यासक्रम एकदम आठवण्याचा प्रयत्न करू नका. एक-एक टॉपिक व्यवस्थित लक्षात आणा.

  1. स्वतःची तुलना करू नका: प्रत्येकाचा अभ्यासाचा वेग वेगळा असतो. स्वतःच्या strong point वर लक्ष केंद्रित करा.

  2. परिणामांपेक्षा (आऊटपुट) प्रक्रियेवर (प्रोसेस) लक्ष द्या: ज्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत आहात, ती तुमच्या कष्टांची फळे निश्चितच देईल.

"सर्वकाही शक्य आहे, फक्त एक विश्वास लागतो - 'मी करू शकतो!' "

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

© निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने**#mpsc#upsc@AspirantsWisdom

2 months, 3 weeks ago

**नाम बडा हो या छोटा, क्या फ़र्क़ पड़ता है,
कदम जो सच के चलें, वही मुक़ाम करता है।
दूसरों को गिराकर जो शोहरत कमाते हैं,
वक़्त उन्हें खुद-ब-खुद आईना दिखाता है।

मंज़िल को पाने की चाह जरूरी है,
अपने हौसलों पर विश्वास ज़रूरी है।
दूसरों की राहों में कांटे न बिछाओ,
अपनी मेहनत से आसमान छूना ज़रूरी है।

पहचान वो जो खुद के दम पर बनती है,
मगर इमानदारी से ही राहें सजती हैं।
दुसरोंका नाम लेकर शोहरत नहीं कमाते,
असल जीत तो मेहनत से सजती है।

©निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने#mpsc
दुनियादारी जॉईन?**https://t.me/AspirantsWisdom

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago