Applied Ambedkar

Description
Applied Ambedkar म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातील असे पैलू जे रोजच्या जीवनात प्रेरणादायी ठरेल.

To Contribute to channel content contact- Nipun @Urmpscmentorhelp/7972433290
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago

5 months, 1 week ago
***दीड दिवसाची शाळा शिकलेला साहित्यिक..***

दीड दिवसाची शाळा शिकलेला साहित्यिक..

शिक्षणातून माणूस मोठा होतो, तुकाराम(अण्णाभाऊ साठे) चांगला शिकला तर घरातील दारिद्र्य संपेल असे त्यांच्या वडिलांना कायम वाटायचे..म्हणून त्यांनी तुकारामाला शिकविण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत घातले..

दरिद्र्याशी झुंज देत हिंदू समाज व्यवस्थेतील सर्वात खालची जात मानल्या जात असलेल्या मांग समाजातून असल्याने त्यांनाही बाबासाहेबांप्रमाणे प्रमाणे शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असे..याचा तुकारामाला फार राग येत असे..

त्यामुळे एकेदिवशी या प्रथेविरुद्ध आपण बंड करावा म्हणून वर्ग सुरू झाला तेव्हा थेट तुकाराम वर्गात शिरला आणि स्पृश्य मुलांच्या रांगेत जाऊन बसला..
हे बघून गुरुजींचा राग अनावर झाला आणि स्वतः जवळ असलेला रुळ थेट
तुकारामावर भिरकावला.
मात्र तुकारामाने तो रुळ वरच्या वर पकडुन नेम धरून परत गुरुजींच्या अंगावर भिरकावला. जो गुरुजींच्या कपाळावर जाऊन आपटला..
याची आपल्याला मोठी शिक्षा होणार हे जाणून तो शाळेबाहेर पळाला व पुन्हा शाळेत पाय ठेवायचे नाही असा निश्चय त्याने केला.

मात्र तुकारामाने शिकण्याची इच्छा काही मरू दिली नाही.. पोट भरण्यासाठी मोल मजुरी करणे, डोअर कीपर, बूटपॉलिश करणे , सिनेमाचे पोस्टर चीटकविने अशी अनेक कामे त्यांना करावी लागली..

अश्यातच पोस्टर चिटकवितांना त्यांना जाणवले की आपण जर शिकलो असतो तर आपल्याला सिनेमाचे नावे वाचता आली असती. त्यामुळे त्यांनी अक्षर ओळख करून घ्यायला सुरवात केली.. त्यातच वरळी मध्ये कपडे विकत असताना ज्ञानु नावाच्या गृहस्थाशी ओळख झाली त्यांनी त्याला वाचायला लिहायला शिकविले..

पोस्टर चीटकवितांना त्याचे काही मित्र झाले त्यातून राजकारण, सिनेमा,कामगार चळवळ,धर्म अश्या अनेक विषयावर चर्चा होऊ लागली.
त्यातून त्यांना आपले ज्ञान वाढविण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे त्यांनी वाचन अजून वाढविले.. लेखनाचा सराव सुरू केला..
यातूनच एका मोठ्या सहित्यासूर्याचा जन्म झाला..

अण्णाभाऊ केवळ 50 वर्ष जगले..
त्यातील साहित्यिक कारकीर्द जवळ जवळ 20 वर्ष..त्यातही संयुक्त महाराष्ट्र चळवळ ,गोवा मुक्ती संग्राम, कामगार चळवळ,स्वातंत्र्य चळवळीत सहभाग
त्यांनी घेतला..
एवढ्या कमी कालावधीत केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या या माणसाने
भांडवलशाही विरुद्ध ,अन्यायाविरुद्ध ,गुलामिविरुद्ध, कामगारांचा व्यथा मांडणारे

चौदा लोकनाट्य,
बारा पोवाडे अनेक लावण्या,
अडीचशेचा वर कथा
पस्तीस कादंबऱ्या लिहल्या..

ज्याचे रशिया जर्मनी बंगाली सिंधी मल्याळी इत्यादी भाषेत भाषांतरही झाले..
आणि अनेक चित्रपटही तयार करण्यात आले..

तात्पर्य -
बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे
Life should be great rather than long..
म्हणजेच आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे..

-निपुण

https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

8 months, 3 weeks ago
9 months, 3 weeks ago

Shall we go for Shorts?

9 months, 3 weeks ago
**स्त्रियांचा पेहराव आणि मुलींचे शिक्षण**

स्त्रियांचा पेहराव आणि मुलींचे शिक्षण
1927 मध्ये महाड येथे बाबासाहेबांनी सत्याग्रहाच्या वेळी स्त्रियांनीही एक सभा घेतली त्यामध्ये त्यांना आवाहन केले की , "तुम्ही आवश्यक नाही की तुमची जात समजून यावी याप्रकारे समाजाने लादून दिलेला पेहराव करावा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुमचा पेहराव कसा असावा ."

लगेच दुसऱ्या दिवशी महाड मधील बऱ्याच अस्पृश्य महिलांनी अश्या प्रकारे साड्या परिधान केल्या ज्या फक्त उच्च वर्णीय महिलाच
परिधान करायच्या
. तसेच पुढे चांदी आणि सोन्याचे दागिने घालण्याच्या उद्देशाने त्यांच्या टिन आणि लोखंडी दागिन्यांचाही त्याग केला .
अर्थात आंबेडकरांचा उद्देश त्यांचा पेहराव सुधारावा हा नसून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणे हा होता..

त्याच सभेमध्ये त्यांनी महिलांना सांगितले की कुठल्याही परिस्थितीत घरात कितीही काम असले तरी त्यांना आपल्या मुलींना शाळेत पाठविण्याचा संकल्प करण्यास सांगितले.

-निपुण
Https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

9 months, 3 weeks ago
**शिक्षणावरील खर्च आणि व्यावसायिकरण**

शिक्षणावरील खर्च आणि व्यावसायिकरण

12 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई विधानपरिषदेत भाषण झाले..त्यामध्ये ते म्हणतात,

शिक्षणावर किती खर्च व्हावा?

तर excise duty (म्हणजे दारू वरील कर) जेवढा जमा होतो किमान तेवढा खर्च हा शिक्षणावर सरकारने करणे अपेक्षित आहे.

तसेच चौथ्यावर्गापर्यंत सक्तीचे शिक्षणाची तरतूदही करावयास सांगतात.

शिक्षणाच्या वाढत्या व्यावसायिकरणा विरुद्धही आवाज उठवला, ते म्हणतात , व्यावसायिकरणामुळे त्यावरील वाढत्या ट्युशन फीस मुळे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण फक्त उच्च वर्गियांची मक्तेदारी झालेली आहे. त्याचा निम्न वर्गियांना फायदा होताना दिसून येत नाही.

शिक्षणातील असमानता अधोरेखित करतांना ते म्हणतात,
उच्च शिक्षणात प्रति दोन लाखामागे उच्च वर्गातील किमान 1000 विद्यार्थी आहेत.. तथापि दलित, निम्न वर्गीय यापैकी हे प्रमाण जवळपास शून्य एवढे आहे.

सर्वामध्ये समानता आणायची असल्यास असमानतेचे तत्व अंगिकारावेच लागेल. म्हणजे जे समानतेच्या रेषेच्या खाली आहेत त्यांना विशेष सोयी सुविधा द्याव्याच लागेल.

-निपुण
Https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

10 months ago
11 months, 3 weeks ago
**ज्ञानार्जन परमो धर्म:**

ज्ञानार्जन परमो धर्म:

डॉ. आंबेडकर जेव्हा 1920 ला शिक्षणासाठी परत लंडन ला जातात. तेव्हा त्यांचे आर्थिक गणित काही जुळत नाही.
सकाळी नाशत्याला माश्याचा तुकडा,चहा, टोस्ट त्यावर टिकली च्या आकाराचे जाम एवढेच काय ते मिळायचे.
त्यांनतर थेट रात्रीच जेवण त्यामध्येही सूप आणि काही बिस्किट्स.
त्यामुळे रात्रीची साधारण 10 वाजता कळकळून भूक लागायची तर त्यांच्या एका गुजराती मित्राने दिलेले 4 पापड काढायचे आणि एक कप दूध पिऊन कसेबसे आपली भूक भागवायचे.
दुपारचे जेवण पैश्या अभावी काही शक्य नसायचे.

अश्या परिस्थितीत आंबेडकरांचा लंडनमधील ज्ञान यज्ञ सुरू होता.
एकाच वेळी बाबासाहेबांचा दोन पदव्यांचा अभ्यास सुरू होता एक म्हणजे डॉक्टरेट DSc आणि दुसरी म्हणजे बॅरिस्टर अट लॉ..
1917 मध्ये लंडन येथून मुंबई ला येताना ज्या जहाजात पुस्तके होती ती जहाज समुद्रात बुडाली त्यामध्ये त्यांनी अमेरिकेतील PhD साठी अगोदर करून ठेवलेले शोधप्रबंधांचे काम,काढलेले टिपणे तेही गेले..त्यामुळे त्यांना वरील अभ्यासासोबत कोलंबिया युनिव्हर्सटी(अमेरिका) येथील PhD साठी शोध प्रबधांचे काम पुर्णपणे नव्याने सुरू करावे लागले.

आपली मुंबईमधील मूकनायक ची जबाबदारी सोडून कसे चालेले.. वृत्तपत्र मराठीत असल्याने आपले मराठी वर प्रभुत्व आणण्यासाठी आपले मित्र शिवतकर यांच्याकडून राम गणेश गडकरी यांचे साहित्य मागवून घेतले ...

एवढे सगळे सुरू असताना,
बाबासाहेबांनी जर्मनी मधील बोन युनिव्हर्सिटी मध्येही प्रवेश घेतला तिथे त्यांना जर्मनी मधील प्रोफेसर जॅकोब यांच्याकडून त्यांना संस्कृत शिकायचे होते परंतु जॅकोब यांचे होऊ घातलेले नीवृत्ती आणि मुंबई लंडन मधील विविध जबाबदाऱ्या मुळे ही योजना फारसी फळाला आली नाही .

याचं कालावधीमध्ये आंबेडकर हे ब्रिटिश म्युझियम लायब्ररी मध्ये सर्वप्रथम जाणारे आणि सर्वात शेवटी निघणारे व्यक्ती होते.

- निपुण
Https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

11 months, 3 weeks ago

मूक-नायक - शिक्षणानेच मुक्ती

1920- बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्य, जालियनवाला बाग हत्याकांड,महात्मा गांधीचे स्वराज्य वृत्तपत्र सुरू, पुढे असहकार चळवळीला सुरवात या सर्व राष्ट्रीय घडमोळींमध्ये ज्यांना कोणी प्रतिनिधी नाही ज्यांचा कोणी आवाज नाही अश्याचा आवाज बनण्याचे काम 29 वर्षीय बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक या पहिल्या वृत्तपत्राने केले.

मूकनायकच्या पहिल्याच संपादकीय मध्ये आंबेडकर लिहितात,

"हिंदू समाज हा एका बुरुजासारखा आहे ज्यामध्ये शिडी किंवा प्रवेशद्वाराशिवाय अनेक मजले आहेत. खालच्या मजल्यावर जन्मलेला माणूस वरच्या मजल्यावर प्रवेश करू शकत नाही, तो कितीही लायक असला तरी वरच्या मजल्यावर जन्माला आलेल्या माणसाला तो कितीही लायक नसला तरी खालच्या मजल्यावर हाकलून देता येत नाही.

हे स्पष्ट आहे की अधिकार आणि ज्ञानाअभावी ब्राह्मणेतर मागासलेले राहिले आणि त्यांची प्रगती रोखली गेली, परंतु किमान गरिबी त्यांच्यासाठी नव्हती. कारण शेती, व्यापार-उद्योग किंवा राज्यसेवा याद्वारे आपली उपजीविका करणे त्यांना अवघड नव्हते. परंतु सामाजिक विषमतेचा अस्पृश्य म्हटल्या जाणाऱ्या लोकांवर होणारा परिणाम विनाशकारी आहे. अस्पृश्यांचा मोठा जनसमुदाय निःसंशयपणे दुर्बलता (असहाय्यता), दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या संगमात खोलवर बुडालेला आहे.

त्यांच्या गुलामगिरीतून निर्माण झालेला नीचपणा त्यांना अनेक वर्षांपासून अंगवळणी पडलेला आहे. त्यांना वाटते की त्यांना ज्या दयनीय स्थितीत ठेवले आहे ती ईश्वराची देन आहे. ही विचारसरणी त्यांना ज्ञान (शिक्षण) देऊनच त्यांच्या मनातून काढून टाकली जाऊ शकते."

- निपुण
Https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

12 months ago

शिक्षणात गुंतवणूक करा

बडोदा सरकार ची स्कॉलरशिप संपल्याने बाबासाहेबांना जुलै 1917 मध्ये आपले लंडन मधील शिक्षण अर्धवट सोडून परत भारतात परत यावे लागले.
पण तिथे बाबासाहेबांनी आपले शिक्षण थांबवले नाही..अथक परिश्रमाने सिडणेहैम कॉलेज मध्ये मिळालेली चांगल्या पगाराची अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची नौकरी(450 रुपये महिना)वर समाधान मानून आरामात जगू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही तर त्यांनी लंडन मधील उर्वरीत शिक्षण पुढे पूर्ण करण्यासाठी पैसे जमा केलेत .
450 rs पगारापैकी 50-60 रूपये रमाई ला घर खर्चासाठी द्यायचे आणि स्वतः वरील खर्च दिवसाला 20 पैसे एवढाच ठेवला.

अश्याप्रकारे काटकसर करून 7000 रुपये त्यांनी प्रोफेसर ची नौकरी करतांना आपल्या ऊर्वरीत शिक्षणासाठी जमा केलेत आणि 1920 मध्ये परत लंडनला उर्वरित शिक्षण(DSc Doctorate, barrister at law) पूर्ण करायला गेले.

- निपुण
Https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

12 months ago

Budgeting आंबेडकर जयंती

बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना मुंबई मध्ये 1915 मध्ये फिरोजशाह मेहता यांचा मृत्य होतो तेव्हा मुंबई सरकार त्यांच्या स्मरणार्थ भव्य पुतळा उभारायचे ठरवते..

तेव्हा 24 वर्षाचे आंबेडकर मुंबई सरकारला पत्र लिहून कळवतात की,
"एवढ्या महान व्यक्तीच्या सन्मानार्थ आपण एक किरकोळ पुतळा उभरतोय..त्याऐवजी मुंबई मध्ये त्यांच्या नावे भव्य वाचनालय उभारण्यात यावे.."

यावरून महान व्यक्तीचा उचित सन्मान कसा करावा हे बाबा साहेबांनी स्वतः सांगितले. सांगितलेच नाही तर पुढे आपल्या कृतीतून दाखवले..जसे की सिद्धार्थ कॉलेज,मिलिंद महाविद्यालय इत्यादी.

जल्लोष हा असावाच पण तो एकूण जयंतीच्या बजेटच्या कितव्या भागातून करावा हे समजणे अपरिहार्य आहे..

Reverse Budgeting

Budgeting करतांना प्राधान्य हे समाजातील समस्यांना ओळखून त्यासाठी काय सृजनात्मक उपक्रम राबविता येतील.
त्यातल्या त्यात आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,प्रबोधनात्मक उपक्रम कुठले राबविता येतील याला प्राधान्य असावे ..
त्यातही शाश्वत सामाजिक भांडवल कशी निर्माण करता येईल जेणेकरून तुम्ही नसतांना पुढील पिढ्याही त्याचा लाभ घेत राहील.

हे सर्व उपक्रम करून जर
काही भाग शिल्लक राहत असेल तर तो जल्लोषात खर्च करावा.(तोही साधारण 20-25%)

पण सद्या उलट budgeting होतांना दिसते . पहिले जल्लोषाचे budgeting होते त्यानंतर काही शिल्लक राहिल्यास इतर उपक्रम करण्यात येतात.

या सद्द्याच्या पद्धतीच्या ऐवजी Reverse budgeting वापरल्यास नक्कीच बाबा साहेबाना अपेक्षित असलेला सन्मान होईल.

- निपुण

Https://t.me/appliedambedkar
https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago