Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

ABCs Diaries... -:ANIL Bhagwan Chavan (ABC )s Diaries...

Description
संपूर्ण लिखाण स्वलिखित... ©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )ग्रुप सुरवात 28जुलै 2022
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month ago

भीमजयंती..💙*💙*💙
उत्सव निळ्या रंगाचा...💙💙💙💙
©️®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️"बोलो रे बोलो जयभिम.. 💙
ताकदसे बोलो जयभिम.💙
. इकडून कोण आले जयभिमवाले💙 तिकडून कोण आले जयभिम वाले..💙
असा जयघोष घुमत निळ्या आकाशात निळा रंग उधळत येणारा एक सण म्हणजेच 14एप्रिल भीमजयंती.. 14एप्रिल 1891ला मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.. आई भीमाबाई तर वडील रामाजी मालोजी सपकाळ.. ते भारतीय सैन्यदलात सुभेदार पदावर होते..जातीव्यवस्थेने बरबटलेल्या आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ जातीमुळे वर्गात बसू देतं नव्हते... अलीकडच्या काळात Waiting for Visa हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच आत्मचरित्र वाचताना एक प्रसंग वाचण्यात आला.. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लहानपणी गावातला न्हावी आमचे केस कापत नव्हता.. जनावराचे केस कापणारा व्हावी केवळ जातीमुळे भीमरावाचे केस कापत नव्हता.. शाळेत सुद्धा सवर्ण मुलासोबत बसता येतं नव्हतं.. त्या काळी कोणालाच वाटलं नव्हतं की, वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे बाबासाहेब आपल्या देशाचे घटनाकार होतील.. पण शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद बाबासाहेब आंबेडकर यांच्यात होती. या कार्यात त्यांना राजर्षी शाहू महाराज,बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड या कर्तबगार मराठा राज्यांनी मोलाच सहकार्य केल.. हे दोन राजे होते म्हणून बाबासाहेब घडले असं अभिमानाने म्हणता येईल..1927चा महाड सत्त्याग्रह 1930मधील गोलमेज परिषद नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्त्याग्रह 1935मध्ये
"मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही..!"
ही घोषणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना करावी लागली.. त्यांनी हिंदू धर्म का सोडला..? तर हिंदू धर्मात असलेली विचित्र जातीप्रथा ज्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगणं सुद्धा हिरावल्या जात होत..1930मध्ये नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाला 5वर्ष संघर्ष करावा लागला पण तरीही मंदिराचे दरवाजे अस्पृश्य समाजासाठी खुले होवू शकले नाही.. जों धर्म आम्हाला मंदिरात प्रवेश देतं नाही त्या धर्मात राहून आपल कल्याण होणार नाही अशी बाबासाहेब यांची धारणा झाली आणि त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला...1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारतासाठी संविधान तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले.. व 2वर्ष 11महिने 18दिवस कठोर मेहनत करून देशाला सर्वोत्तम संविधान देण्याच राष्ट्रीय कार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी पार पाडल.. संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वांनाच समता, स्वातंत्र्य, बंधुत्व प्रदान करत सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब प्रयत्नशील राहीले.. आणि मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय हा संदेश देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मवादापेक्षा राष्ट्रवाद श्रेष्ठ मानला..देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यात बाबासाहेब आंबेडकर यांच योगदान खूप मोठ आहे..14ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला व भारतातील सगळ्यात जुन्या एका धम्माला पुन्हा एकदा नव जीवन प्रदान केल...त्यामुळे अश्या  महान युगपुरुषांची जयंती एक राष्ट्रीय सण म्हणून देशातील सर्व नागरिकानी साजरा करायला हवा..सण कोणताही असो दिवाळी, दसरा, होळी आंबेडकर जयंती हे सर्व सण सार्वजनिक सण म्हणून साजरे करायला पाहिजे.. नाहीतर हा सण बौद्धाचा तो सण हिंदूचा, तो सण मुस्लिमाचा हा भेदभाव तुम्ही जर आजच्या काळात जर करत असाल तर तुमच्या सुशिक्षित पणाला काही अर्थ नाही. शिक्षण घेवून जाती, धर्म, पंथ या चौकटीतं तुम्ही अडकून असाल तर, तुमच्याइतका मूर्ख दुसरा कोणीच नाही..म्हणून प्रत्येक सण सर्वांनी साजरे करा नाही साजरे केले तर किमान कोणाच्या धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचा अपमान होईल असं काही करू नका...
भीमजयंती म्हणजे निळ्या रंगाचा निळा उत्सव आहे निळा रंग हा निळ्या आकाशाचा निळा रंग आहे.. निळ्याशार समुद्राच्या पाण्याचा रंग निळा आहे.. निळे आकाश कसलाच भेद करत नाही.... त्यामुळे निळा रंग हा स्वाभिमान समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांच प्रतीक आहे.. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार वागण्या जगण्याचा.. संकल्प करत ही भीमजयंती उत्साहात साजरी करा...!"
जयभिम..🙏💙
लिखाण दी.14एप्रिल 2024
लेख कसा वाटला? याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा...
✍️संपर्क -:**8806379959

1 month ago
ABCs Diaries... -:ANIL Bhagwan Chavan (ABC …
1 month ago
ABCs Diaries... -:ANIL Bhagwan Chavan (ABC …
1 month, 1 week ago
1 month, 1 week ago

नोकरीची गॅरंटी कोणी देईल का...
नक्की वाचा..
©️*®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️"सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे..सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले आहे,काँग्रेस पक्षाने तर स्वतः चा जाहीरनामा घोषित केला आहे.. त्यामध्ये 30 लाख नोकऱ्या देण्याच आश्वासन दिलं आहे.. मागच्या वेळी भाजप सरकारने दिलेली आश्वासन तर केवळ निवडणुक जुमला ठरली आहे... प्रत्येकाच्या खात्यात 15लाख जमा करू अशी मोदीची गॅरंटी होती.प्रत्यक्षात काहीच्या खात्यात 15रुपये सुद्धा आलेले दिसतं नाही.गेल्या वर्षभरापासून वर्तमान पत्रात रोज जाहिरात येते मोदीची गॅरंटी...लोकांना मोफत घरघुती गॅस, देणे कर्ज देणे अश्या काही बाबतीत मोदी सरकारच यश सरकार मिरवताना दिसते.. पण अलीकडे देशातील बेरोजगारीवर Indian Employment Report 2024चा हा रिपोर्ट ILO -International Labour Organization व Institute of Human Development(IHD )या दोन संस्थानी प्रकाशित केला या अहवालानुसार भारतात सद्या 82.9%म्हणजे जवळपास 83%तरुण बेरोजगार आहेत..ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालण्यासारखी आहे..सद्या आपल्या देशाची लोकसंख्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अहवाल 2023नुसार 1,438,732,489 म्हणजे जवळपास अंदाजे 144कोटीच्या आसपास आहे..त्यामुळे सध्या जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश म्हणून चीनच्या नावावर असणारा विक्रम आपण मागच्या वर्षी मोडला.. त्यामुळे सद्या भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे..2021मध्ये जनगणना व्हायला हवी होती. पण कोरोनाच कारण करून सरकारने ही जनगनणा अजून पुढे ढकलली.जनगणनेतून देशाची आर्थिक स्थितीच विदारक चित्र जनतेसमोर येईल आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल,या भीतीने जनगणना करण्यात सरकारने चालढकल केलेली दिसते...जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात प्रत्येक 100तरुणामध्ये 83तरुण बेरोजगार आहे, बेरोजगारीच हे चित्र भीषण आहे..100%नोकरीच आश्वासन देणाऱ्या IIT मुंबईसारख्या संस्थेत 37टक्के तरुणांना नोकऱ्या नाही.. एकीकडे प्रचंड महागाई आणि भीषण बेरोजगारीच्या या जगात आजच्या तरुणांना मंदिर नको तर रोजगार हवा आहे.. जगण्याच्या धावपळीत सुरक्षित जीवन जगण्याची हमी हवी आहे.. राजकीय पक्ष सत्तेत येतात आणि जातात पण सद्या नोकरीची गॅरंटी कोणता राजकीय पक्ष देईल..? याकडे तरुणाच लक्ष आहे.. काही राजकीय पक्ष जाणूनबुजून निवडणुकीत जातं,धर्म हा विषय आणतात,धर्माच्या नावाने मत मांगतात. पण अश्याने देशाचे मूलभूत प्रश्न मागे पडतं आहे.. रस्ते, जल पायाभूत सुविधा, विज या बरोबर नव्या पिढीला एक सुरक्षित भवितव्य हवं आहे.. त्यामुळे नोकरीची गॅरंटी देणाऱ्यालाच आम्ही मतदान करू असा सुर सगळीकडे आहे..
अलीकडच्या काळात तर खाजगीकरणाच वारं झपाट्याने वाढलं आहे.सरकारी व्यवस्थेच खाजगीकरणं करण्यात वर्तमान सरकार पुढे आहे.. त्यामुळे सगळीकडे करारबद्ध सेवा.. कॉन्ट्रॅक्ट बेस नोकऱ्या वाढत आहे. पण अश्या नोकऱ्यांना भविष्य नाही. सैन्य दलात सुद्धा अग्नीवीर सारख्या योजना आणून सरकारने सैन्यादलाच सुद्धा कंत्राटीकरणं सुरू केल आहे.. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांच सैन्यदलात जाण्याच स्वप्न भंग झालं.. मोठ्या प्रमाणात विरोध होवून सुद्धा सरकारने जबरदस्ती ही योजना लादलीच.. हे सरकार जनभावनेचा पुरेसा आदर ठेवत नसल्याच निदर्शनास आलं आहे..त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळात तरुणांना नोकरींची गॅरंटी देणारं सरकार नक्की आवडेल.. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जात, धर्म यावर राजकारण करण्यापेक्षा बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी आत्महत्या, निर्यात वाढ याकडे लक्ष देवून येणाऱ्या काळात विकसित भारताच स्वप्न साकार करायला हवं...!"
✍️लिखाण दी..9एप्रिल 2024
(लेखक सद्या UPSC ची तयारी करत असून भारतीय संविधान, राजकारण, व अर्थकारण हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहे..)
प्रतिक्रिया नक्की कळवा...
✍️संपर्क -:8806379959
टेलिग्राम ID -
*@ABCs1432

1 month, 1 week ago
1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago

**सरकारी यंत्रणावर दबाव टाकून यंत्रनेचा दुरुपयोग करणे.. न्यायव्यवस्थेवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करणं, विरोधी पक्षाला बोलू न देण मीडियावर हल्ले होणं यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे..कोणीतरी म्हटलं आहे की सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते निरंकुश सरकार हुकूमशाही लादू शकते स्पष्ट बहुमताच्या बळावर देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होण्याची भीती आहे त्यामुळे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं आवश्यक आहे....!"
लिखाण दी..2एप्रिल 2024

(लेखक सद्या upsc तयारी करत असून भारतीय संविधान आणि राजकारण हा त्यांचा ऑप्शनल विषय आहे...)

हा लेख कसा वाटला? याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा..

✍️लेखक संपर्क -:8806379959**

1 month, 2 weeks ago

भारतीय संविधान खरच धोक्यात आहे कां..?लोकशाहीला धोका आहे कां..?
नक्की वाचा..
©️*®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️*"अलीकडच्या काळात काँग्रेससह आम आदमी पार्टी, शिवसेना उबाठा व इतर विरोधी पक्षांनी दिल्लीमध्ये संविधान बचाव रॅली काढली.. संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे असा सुर विरोधी पक्षाचा आहे.. पण खरच भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलल्या जाईल कां..? लोकशाही संपुष्टात येईल कां?असे अनेक प्रश्न आहे या प्रश्नाच उत्तर देण्यासाठीच आजचा लेख आहे..

खरच संविधान बदलता येतं कां...?

✍️"खरं सांगायचं तर काळ आणि परिस्थितीनुसार संविधानामध्ये नवीन तरतुदी करता येतात नवे कायदे करता येतात.. शिवाय संविधानातील काही तरतुदी सुद्धा बदलता येतात... पण यासाठी 3प्रक्रिया आहे..संविधानातील कलम 368मध्ये याबद्दल तरतूदी आहे...
या 3पद्धती खालीलप्रमाणे

1)साध्या बहुमताने दुरुस्ती करणे...
यामध्ये राज्याची नाव बदलणे,नवीन राज्य स्थापन करणे नागरिकत्व अश्या बऱ्याच काही कमी महत्वाचे विषय असतात....

2)2/3बहुमताने दुरुस्ती करणे
यामध्ये संसदेचे अधिकार केंद्र राज्य संबंध
अश्या काही महत्वाचे विषय असतात...

3)2/3बहुमत व अर्ध्या राज्याची सहमती....
यामध्ये मूलभूत अधिकारात बदल करणे, मार्गदर्शक तत्वामध्ये बदल 7व्या अनुसूचीमधील विषय, न्यायालय अश्या महत्वाचे विषय येतात...
मुळात भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याची प्रकिया खूप किचकट आहे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खूप बुद्धिमान आणि दूरदृष्टी असणारे व्यक्ती होते.. भविष्यात भारतीय संविधानावर हल्ले होवू शकतात संविधान बदलण्याचे प्रयत्न होवू शकतात.. याची भीती डॉ. आंबेडकर यांना होतीच त्यामुळेच त्यांनी संविधानातील कलम 32नुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर एक जबाबदारी सोपवलेली आहे ती म्हणजे संविधानाची सुरक्षा करण्याची जबाबदारी.. सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा सरक्षक म्हटलेलं आहे.संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेला कोणताही कायदा संविधानिक तत्वाच उलंघन करत असेल तर, सर्वोच्च न्यायलय तो कायदा रद्द करू शकते.. गेल्या 70वर्षात अनेकदा संविधानावर हल्ले झाले.. पण तरीही सर्वोच्च न्यायालयाने या हल्ल्यातून संविधान वाचवलं आहे.23मार्च 1973मध्ये केशवानंद भारती खटल्याने संविधानाला जीवनदान दिलं आणि या खटल्यातील निकालानुसार संसद संविधानात बदल करू शकते पण संविधानाचा मूलभूत ढाच्या कोणालाच बदलता येतं नाही..
म्हणून सरकार कोणत्याही पक्षाच आलं काँग्रेस, भाजप किंवा इतर तरीसुद्धा ते संविधानाचा मूलभूत ढाच्या कधीच नष्ट करू शकतं नाही.. नागरिकांचे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्व, संसद,स्वातंत्र्य न्यायपालिका ह्या प्रक्रियामध्ये कोणालाच कसलाच बदल करता येणार नाही...
खरं सांगायचं तर स्पष्ट बहुमत आणि सत्तेच्या बळावर संविधानावर हल्ले करण्याचे प्रकार अनेकदा घडले. हे प्रकार फक्त भाजप सरकारमध्येच झाले असे नाही तर,काँग्रेस सरकारच्या इंदिरा गांधी यांच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात संविधानातील तरतुदी बदलण्याचा प्रयत्न झाला...म्हणूनच तर केशवानंद भारती खटल्यामध्ये न्यायालयांने मूलभूत सरचना दिली...वर्तमान सरकारची काही धोरण सुद्धा लोकशाही व्यवस्थेला शोभण्यासारखे नाही.. सगळ्यांतं जास्त गैरवापर झाला तो पक्षांतर बंदी कायद्याचा काहीही करून सत्ता मिळवण्याच्या उद्देशानी अनेक राज्यात विरोधी पक्षाची सरकारे बेकायदेशीर पद्धतीने फोडण्यात आले.. दुसरी गोष्ट म्हणजे ED आणि CBI चा वापर केवळ विरोधी पक्षांना संपवण्यासाठी केल्या जातोय कां?अशी शंका सर्वसामान्य नागरिकांना येते कारण गेल्या 10वर्षात सत्त्ताधारीं पक्षातल्या एकही नेत्यावर ED आणि CBI ची कारवाई झालेली नाही.. उलट लाखो कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते सत्ताधारी गटात सामिल होवून पवित्र होत आहे..हा शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग आहे.. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्याना अटक करण्यात आलं.. पण 6महिने ऑलिम्पिक खेळाडूंने आंदोलन करून सुद्धा आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नाही.. हा कसला न्याय आहे..?
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे पण सद्याच सरकार विरोधी पक्षांना संपवण्याच्या मार्गांवर आहे..यामुळेच विरोधी पक्षांनी लोकशाही बचावची घोषणा केली..भाजप सत्तेत आल्यावर संविधान तर बदलू शकणार नाही पण विरोधी पक्षाची पार वाट लावून टाकेल म्हणूनच या भीतीने संविधान बचावं रॅली निघत आहे..खरंतर संविधान स्वतः च स्वतः ची सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे.. त्यासाठी भरभक्कम तरतुदी संविधाननिर्मात्याने केलेल्या आहे..पण तरीही सत्तेचा दुरुपयोग व कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी नागरिक,तरुण राजकीय पक्ष, प्रसार माध्यम सर्वांनी भरभरून प्रयत्न करणं आवश्यक आहे...संविधानाचा मूलभूत ढाच्या तर कोणालाच बदलता येणार नाही पण सत्तेचा दुरुपयोग, कायद्यातील पळवटा शोधून जनतेची फसवणूक होतं आहे..**

3 months, 3 weeks ago
**आरक्षण बस

आरक्षण बस
✍️"मुळात प्रश्न आरक्षण देवून सुटत नाही. मराठा समाजाच समावेश OBC मध्ये करून आधीच खूप गर्दी झालेल्या OBC Reservation Bus मधील गर्दी सरकारने वाढवली.मुळात ही गर्दी कमी कशी करता येईल?यासाठी अधिक बस वाढवणे (मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या सरकारी नोकऱ्याच्या जागा भरणे आणि अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने प्रयत्नशील असलं पाहिजे..वर्तमान सरकारे मंदिर,मस्जिद मध्ये जास्त रस घेणारे आहे.. त्यामुळे अश्या सरकारच अर्थव्यवस्थेकडे आणि भीषण बेरोजगारीकडे पुरेसं लक्ष नाही.. मराठा आरक्षण ही एक तात्पुरती मलमपट्टी आहे.. त्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा मोठ्या प्रमाणात नोकरभरती होईल..!"
©️*®️लेखक -अनिल भगवान चव्हाण (ABC )
दि 27जानेवारी 2024
✍️संपर्क -:* @ABCs1432

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago