Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

राजकारण

Description
गल्ली ते दिल्ली
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

3 years ago
राजकारण
3 years, 6 months ago
राजकारण
3 years, 6 months ago
राजकारण
3 years, 6 months ago
राजकारण
3 years, 9 months ago
राजकारण
3 years, 11 months ago

https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/china-behind-nepals-provocation/articleshow/76482613.cms

महाराष्ट्र टाइम्स

नेपाळच्या चिथावणीमागे चीन

Ravivar MATAभारत आणि चीनमधील तिबेट हे 'बफर स्टेट' गेल्यानंतर नेपाळ, सिक्कीम आणि भूतानला भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले. नेपाळमध्ये १९५० ते २०२० या दरम्यान खूप घडामोडी झाल्या.

राजकारण
3 years, 11 months ago

कळले नाही आणि हा विषाणू व्यक्तीव्यक्तींमधून संक्रमित होत नसल्याचे जाहीर केले. बिनबुडाचे हे वक्तव्य करून त्यांनी जगाला गाफिल ठेवले. जगभरात जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पाळले जातात, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जगाची दिशाभूल करत चीनची पाठराखण केली. चीनमध्ये प्रवास करू नये असा धोकाही नसल्याचे सांगितले. परंतू दुसरीकडे अमेरिकेने चीनला जाण्यास बंदी घातली होती. पाश्चात्य देशांच्या निष्काळजीपणामुळे हा विषाणू पसरला असेही विधान डब्लूएचओ ने मार्च मध्ये केले होते. ही संघटना चीनच्या बाजूने आहे का किंवा चीनच्या आश्रित आहे का असेही प्रश्न यामुळे पडतात.

WHO चीन धार्जिणी का बनली ?:-

डब्लूएचओच्या अशा वर्तणुकीमागे एक कारण असू शकते ते म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वच जागतिक संघटनांतून माघार घेण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे या संघटनांना अर्थपुरवठा करावा लागणार नाही आणि तो पैसा वाचवून अमेरिकेची अर्थव्यवस्था टिकवून ठेवता येईल असे ट्रम्प यांनी बोलूनही दाखवले. हेच चीनच्या पथ्यावर पडले. जिथे जिथे अमेरिकेने अंग काढून घेतले तिथे चीनने शिरकाव केला. जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक अर्थपुरवठा अमेरिका करत होती, परंतू चीन ने शिरकाव केला आणि टायग्रोस या डब्लूएचओच्या अध्यक्षांना निवडून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. चीनच्या या उपकारांची जाण ठेवत कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनची पाठराखण करत जगाला कोरोना संसर्गाच्या विळख्यात लोटले. जानेवारी महिन्यातच जगाला सावधगिरीची सूचना देण्याऐवजी जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेली बोटचेपी भूमिका न घेता जागतिक आरोग्य रक्षणाचे त्यांचे ध्येय कायम ठेवले असते तर आज जग ठप्प झाले नसते, लोकांना घरबंदी व्हावे लागले नसते, आंतरराष्ट्रीय स्तरावर जगबंदी होण्याची वेळ आली नसती हे नक्की.

कायमस्वसरूपी निधीची उपलब्धता नाही :-

संयुक्त राष्ट्र संघटनेत 193 देश आहेत परंतू हे देश जागतिक आरोग्य संघटनेला म्हणावे तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी जोपर्यंत सर्वच देश या संघटनांना पुरेसा निधी उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत या संघटना विशिष्ट देशांच्या तळी राखणार, जे देश त्यांना निधी पुरवतात. 2003 मध्ये जेव्हा सार्स ची साथ आली होती त्यावेळी अमेरिका मोठ्या प्रमाणावर निधी देत होता, तेव्हा जागतिक आरोग्य संघटना अमेरिकेच्या निर्देशांनुसार काम करत होती. तेव्हा डब्लूएचओने चीन विरोधात कडक भूमिका घेतली होती. परंतू आता चीनने निधी देण्याबाबत महत्वाची जागा घेतली आहे, याच संघटनेला नव्हे तर इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांना चीन मोठा निधी देत आहे. स्वाभाविक डब्ल्यूएचओने चीनची बाजू उचलून धरली आहे.

बहुराष्ट्रीय संघटनांना राजकारणापासून दूर ठेवणे गरजेचे :-

वास्तविक या सर्व संघटनांना
आंतरराष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. विशेषतः जागतिक आरोग्य संघटनेची फार मोठी जबाबदारी आहे कारण विकसनशील देशांमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. अनेक साथीचे रोग आहेत, ज्यामुळे विकसनशील देशांमध्ये हजारो लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. परंतू त्यावरील आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक त्या लसींचा विकास करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे काम आहे. परंतू जागतिक आरोग्य संघटनेसारखी संस्थाच जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र होते तेव्हा मात्र डब्ल्यूएचओ ही आपल्या उद्दीष्टापासून भरकटलेली दिसते. असा आरोप या घडीला डब्ल्यूएचओ वर होताना दिसतो आहे. औषध निर्माण कंपन्यांच्या औषधांचे मार्केटिंग किंवा विपणन कशाप्रकारे करता येईल अशा पद्धतीने डब्ल्यूएचओ करतो असाही आरोप संघटनेवर होताना दिसतो. वास्तविक ज्या उद्देशाने डब्ल्यूएचओ ची स्थापना करण्यात आली होती. त्या उद्दीष्टाला बगल देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने या सर्वांपासून दूर राहाणे आवश्यक आहे. उलट विकसनशील देशांमध्ये जे गरीब देश आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने असे साथीचे रोग येतात, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक असे नुकसान होते त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व आंतरराष्ट्रीय समुदायामधल्या राष्ट्रांनी जर गरज पडली तर त्यांना मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून जागतिक आरोग्य संघटनेचा वापर कोणताही देश आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा वरचष्मा दाखवण्यासाठी करणार नाही.

3 years, 11 months ago

का पडली अमेरिका WHO मधून बाहेर ?

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर

अमेरिकेने शेवटी WHO ला सोडचिट्ठी दिली .गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि WHO मधला संघर्ष वाढला होता .अमेरिकेने WHO ला दिला जाणारा $500 दशलक्ष्य चा निधी यापूर्वीच रोखला होता .एप्रिल महिन्यात काही अटी WHO ला एक महिन्यात पूर्ण करण्यास अमेरिकेने सांगितले होते .त्याची पूर्तता झाली नाही .शेवटी अमेरिकेने या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला .यातून बहुराष्ट्रीय संघटना महासत्तांच्या राजकारणाचे व्यासपीठ कसे बनत आहेत याचे दर्शन होते .प्रश्न आहे की अमेरिकेने एवढा टोकाचा निर्णय का घेतला ? WHO चे नेमके काय चुकले ? हे समजून घेतले पाहिजे .

WHO आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग बनली :-

अमेरिकेचे WHO मधून बाहेर पडणे हे या संघटनेच्या वाढत्या राजकीयीकरणाचे लक्षण आहे .आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुराष्ट्रीय संस्था मग ती जागतिक आरोग्य संघटना, मानवाधिकार समिती यांसारख्या संघटना खरेतर स्वतंत्र असल्या पाहिजेत मात्र गेल्या काही वर्षांत या संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग झाल्याचे दिसून येते आहे. विकसित महासत्तांच्या सत्ता समीकरणाच्या राजकारणाचं व्यासपीठ होताना दिसताहेत. जसे संयुक्त राष्ट्र संघटना त्याच्या स्थापनेपासून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील आणि आत्ता अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्तासमतोलाच्या राजकारणाचे व्यासपीठ बनली आहे. तीच अवस्था जागतिक आरोग्य संघटनेची आत्ता झालेली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्तासमतोलाच्या राजकारणाचा ती एक भाग होत असल्याचे दिसून येत आहे. या जागतिक स्तरावरील संघटनांचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे फंडिग. त्यांना आवश्यक असलेला निधी मिळत नाही. विकसित किंवा श्रीमंत देश त्यांना निधी पुरवत असतात आणि मग या देशांची बाजू उचलून धरण्याचे काम या संघटना करतात. जे अर्थातच दुर्देवी आहे. कधीकाळी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात जास्त निधी देत होता, परंतू आता ती जागा चीनने घेतली आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओ सध्या चीनची बाजू घेताना दिसत आहे.

WHO नी केलेल्या चुका :-

अमेरिकेने WHO मधून बाहेर पडण्याच्या निर्णयाकडे चुकीचा किंवा केवळ राजकारणाचा भाग म्हणून पाहता येणार नाही. त्यासाठी गेल्या काही महिन्यातल्या WHO काही चुका प्रामुख्याने जबाबदार आहेत . या चुका पुढील प्रमाणे सांगता येतील
#नोव्हेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला होता; पण जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यासाठी 11 मार्च उजाडले. म्हणजे तीन - साडे तीन महिन्यांनंतर डब्ल्यूएचओने महामारी जाहीर केली. वुहानमध्ये 17 नोव्हेंबर रोजी पहिला कोरोनाचा रूग्ण लक्षात आल्यानंतर 20 डिसेंबरपर्यंत चीनने काही कृती केली नाही. त्यावेळी चीनने हा संसर्गजन्य विषाणू नसल्याचे सांगितले. त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू उचलून धरणे अत्यंत चुकीचे आहे.

#जागतिक आरोग्य संघटनेलाच या विषाणूचे गांभीर्य कळले नाही आणि हा विषाणू व्यक्तीव्यक्तींमधून संक्रमित होत नसल्याचे या संघटनेने सुरवातीला जाहीर केले.

#जागतिक आरोग्य संघटनेने जगाची दिशाभूल करत चीनची पाठराखण केली.

जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू उचलून धरणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळेच अशा जागतिक संघटना ज्यांनी तटस्थ राहिले पाहिजे, ज्यांना विकसनशील देशांमध्ये आरोग्याचे महत्त्वाचे काम करायचे आहे, त्याच संघटना जर सत्ता समतोलाचा भाग होत असतील तर किंवा त्या राजकारणातील हत्यार म्हणून वापरल्या जात असतील, जागतिक पातळीवर त्याच्याइतकी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही.

WHO ला कोरोनाचे गांभीर्य कळलेच नाही :-

कोरोना विषाणूने जगभरात कल्लोळ माजवला आहे. त्याची दहशत बसावी इतका त्याचा प्रसार जगाच्या कानाकोपर्‍यात होतो आहे. कोरोनाने आत्तापर्यंत किती बळी घेतले आहेत ह्याची आकडेवारी आपल्याला कळते आहे परंतू भविष्यात ही आकडेवारी किती असेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाहीये. भारतात याचा शिरकाव झाला नि आपण हादरलो. आज संपूर्ण देश लॉकडाऊन करून लोकांना आपल्याच घरात कोंडून रहावे लागते त्याला जबाबदार कोण आहे, जगभरात अनेक बळी जाताहेत त्याला जबाबदार कोण आहे, जगातल्या 10 जीवघेण्या विषाणूंचा जन्म हा परदेशातच झालेला आहे, असे असूनही त्याचे परिणाम मात्र भारताला भोगावे लागले आहेत. सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू नंतर आलेला हा कोरोना विषाणू. चीनच्या वुहान प्रांतात झाला हे आता लपून राहिले नाहीये, चीनने अर्थातच सर्वच जगापासून लपवून ठेवले, परंतू चीनलाही हा विषाणू एवढ्या लोकांचे बळी घेईल असे वाटले नव्हते. परंतू डॉ. ली सारख्या चिनी डॉक्टरांनी याची कल्पना देऊ केली तेव्हाही चीनने त्यांची मुस्कटदाबीच केली होती. दरम्यानच्या काळात पर्यटनप्रेमी असलेले चीनी नागरिक आणि व्यापारी अजाणतेपणी सर्व जगभरात फिरत या रोगाचा प्रसार करत होते.
असे असताना जागतिक आरोग्य संघटनेलाच या विषाणूचे गांभीर्य

4 years ago

भाजपचा 'डमी'वर शिक्का, ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकला उमेदवारी!

भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध जरी होणार (BJPs  Ramesh Karad to replace Ajit Gopchhade MLC polls) असली तरी त्यामध्ये रंगत येताना दिसत आहे. कारण भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला आहे. भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी 8 मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली. (BJPs  Ramesh Karad to replace Ajit Gopchhade MLC polls)

भाजपने 8 तारखेला अजित गोपछडे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे उमेदवारी अर्ज भरले होते. त्याशिवाय डमी अर्ज म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांना अर्ज भरण्यास सांगितले. पण आता डमी उमेदवार असलेले रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने निवडले आहे.

रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं सांगण्यात येत आहे. कराड यांनी दोन वर्षापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करुन, धनंजय मुंडे यांची मोठी अडचण केली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने, अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती.

त्यानंतर आताही ऐनवेळी भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवलं आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. 2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून निवडायच्या विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता.

विधानसभा निवडणुकीला निराशा

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही रमेश कराड यांची निराशा झाली होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे रमेश आप्पा कराड (Ramesh Karad latur rural) यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होती. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आवळल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं होतं.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते.

सध्या ते पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात

2018 मध्ये त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेचं तिकीट दिलं होतं

मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता

4 years ago
राजकारण
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago