Maharashtra Congress

Description
Official Telegram account of Maharashtra Pradesh Congress Committee
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her

1 year ago

आसाम मध्ये राहुल गांधींना मंदिरात जाऊ दिले नाही म्हणून ते मंदिरासमोर रस्त्यावर बसून
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
हे गाणं गात आहेत.

#BharatJodoNyayYatra

1 year, 3 months ago
Maharashtra Congress
1 year, 3 months ago

सत्यम् शिवम् सुन्दरम्

- राहुल गांधी

अशी कल्पना करा की, जीवन म्हणजे प्रेम आणि भीतीच्या महासागरातून पोहणे आहे. आपण या अत्यंत सुरेख परंतु अथांग अशा महासागरात एकत्र आहोत आणि अत्यंत सामर्थ्यसंपन्न तथा सतत परिवर्तनशील असणाऱ्या त्याच्या प्रवाहात आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहोत. या महासागरात प्रेम आहे, परस्पांचे संबंध आहेत, अपरिमित आनंद देखील आहे. परंतु त्यामध्ये भीतीचे अस्तित्वसुद्धा आहे. मरणाची भीती, भुकेची भीती, काहीतरी गमावण्याची किंवा वेदनेची भीती तर कधी नाकारले जाण्याची आणि अपयशाची भीती. या भीतीचे अस्तित्व देखील या महासागरात आहे. आणि आपले आयुष्य म्हणजे या सुंदर अशा महासागरातून सामूहिक प्रवास आहे. आपण सर्वजणच हा महासागर पार करत आहोत. पाहायला गेले तर हा अत्यंत सुंदर आहे परंतु तितकाच भयावह देखील आहे. भयावह अशासाठी की, इथे कोणीच शाश्वत काळापर्यंत राहू शकले नाही आणि भविष्यातही राहू शकणार नाही.
मात्र कोणत्याही भीतीपासून परावृत्त होत या समुद्राचे वास्तव स्वरूप जाणून घेण्याचे सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर तो हिंदू आहे. ‘हिंदुत्व म्हणजे काही सांस्कृतिक नियम’ असे मानणे हे हिंदुत्वाचा गैरअर्थ काढण्यासारखे होईल. त्याचप्रमाणे हिंदुत्वाला विशिष्ट देशापुरते अथवा भौगोलिक सीमांपुरते मर्यादित स्वरूप देणे हे देखील त्याला बंधने घालण्यासारखे होईल. हिंदुत्व म्हणजे आपल्याला वाटणारी भीती ओळखून तिचा आपल्याशी असणारा संबंध लक्षात घेत ती भीती कमी करणे होय. हिंदुत्व हा सत्याचा साक्षात्कार करून घेण्याचा मार्ग आहे. त्यामुळेच तो कोणा एकापुरता मर्यादित नसून, सर्वांकरिता खुला आहे. ज्या कोणाला या सत्याचे दर्शन घ्यायचे आहे ते सर्व या मार्गावरून चालू शकतात.
हिंदू हा स्वतःकडे आणि या जीवनरूपी समुद्रातील प्रत्येकाकडे प्रेम, आत्मीयता आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहतो. कारण त्याला याची जाणीव असते की, आपण या महासागरात एकत्रपणे नांदत आहोत. या महासागरात आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड करत पोहणाऱ्या प्रत्येकापर्यंत हिंदू पोहोचतो आणि त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नव्हे तर अगदी दुबळ्या आणि मूक वेदनांच्या संवेदनाही त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात इतका तो संवेदनशील आहे. दीनदुबळ्यांची सेवा करणे आणि त्यांचे संरक्षण करणे यालाच हिंदू त्याचा धर्म असे मानतो. सत्य आणि अहिंसेच्या कवडशातून संपूर्ण जगाकडे पाहात आणि त्याच्या सुप्त चिंता समजावून घेत त्या दूर करण्याचे काम हिंदू करतो.
हिंदू हा अंतर्मनात डोकावून पाहतो आणि स्वतःतील भीतीला समजावून घेत तिचा स्वीकार करण्याचे धैर्य स्वतःमध्ये बाळगतो. हिंदू हा, भीतीचे शत्रुत्व नाहीसे करून मित्रत्व प्रस्थापित करत त्यातून संपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन मिळवत हिंदू पुढे जातो. हिंदू हा कधीही गांजलेले नसतो. तो स्वतःवरती भीतीला स्वार होऊ देत त्याद्वारे क्रोधाला, द्वेशाला आणि हिंसेला स्वतःमध्ये प्रवेश करून देत नाही.
हिंदुला याची जाणीव असते की, या जगातील जे काही ज्ञान आहे ते सामूहिक आणि सर्वांच्या इच्छाशक्ती आणि प्रयत्नाचे फळ आहे, ती कोणा एकाची मिराशी नाही. त्याला याचे ज्ञान नक्कीच असते की प्रत्येक गोष्ट ही सातत्याने क्रमविकास होणारी आहे, त्यामुळे कोणतीच गोष्ट पूर्वी होती तशी राहात नाही. त्याला खोल अंतर्मनामध्ये एक जिज्ञासा देखील आहे, ही जिज्ञासा त्याला ज्ञानप्राप्ती करण्यासाठी मनाचे कवडसे सतत उघडे ठेवायला भाग पाडते. हिंदू हा अत्यंत दयाळू आणि या जीवनसमुद्रात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यास सदैव तत्पर असतो.
हिंदू हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रत्येकाला हा समुद्र समजून घेण्यासाठी त्याचा मार्ग निवडण्याचा अधिकार असल्याचे स्वीकारतो. हिंदू हा प्रेम करतो, सन्मान देतो आणि स्वतःने निवडलेल्या मार्गांप्रमाणेच इतरांनी निवडलेल्या मार्गाचा देखील आदर करतो.

1 year, 4 months ago

Important ?

Follow Shri Rahul Gandhi’s channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029Va4UV6wEgGfQZv5KY12z

WhatsApp.com

Rahul Gandhi | WhatsApp Channel

Rahul Gandhi WhatsApp Channel. Leader of Opposition, Lok Sabha | Member of the Indian National Congress | Member of Parliament, Raebareli. 7.2M followers

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her