Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

मनातील भावना..✍💌

Description
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।

तुमच्या ही भावना आम्हाला पाठवत जा.👇
@Ganesh5463
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month ago

Last updated 1 month, 3 weeks ago

2 weeks, 5 days ago

Menstrual Hygiene Day 2024
माझ्या नातेवाईकांनी मिल कामगारांची मुंबई ते मॉलवाली मुंबई इतके झपाट्याने परिवर्तन पाहिले. आमच्या गावातील निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित झाली. पण मासिक पाळीतील बंधने मात्र मुंबईच्या छोट्याश्या खोलीत हि काटेकोर पाळले जायचे.
माझं बालपण देखील मासिक पाळीतील कपडे लपवून कसे सुकवायचे आणि छोट्याश्या हॉलमध्ये ५ दिवस अस्पृश्य कसे राहायचे यात गेले. जेवण - पाणी लांबून द्यायचे. या पाच दिवसाचे अंथरून पण वेगळे असायचे. पाच दिवसा नंतर तर ते पुन्हा धुवून ठेवायचे. त्यात कोणी "जाणवे घातलेले किंवा माळकरी म्हणवणारे" घरी आले तर, मासिक पाळी आल्यावर मला बोलण्याची हि पाबंदी होती. अन्यथा ते "पाण्याचा तांब्या उलटा करून श्राप देतात." हि भीती घालायचे. घरात गोमूत्र शिंपडले जायचे.

त्यानंतर घरी गणपती, दिवाळी, दसरा, लग्न समारंभ आले कि मासिक पाळीच्या गोळ्या खाण्याचा एक "नवीन संस्कार" घरी करण्यात आला. घरातील स्त्रिया म्हणजे आई बहिणी मैत्रिणी कायम सणवार आला कि, "किती गोळ्या आणायच्या ? कधी पासून खायच्या ? कुठली गोळी चांगली ? मग त्याने दिवस मागे येतात कि पुढे जातात ? त्यामुळे कोणाकोणाला किती उलट्या होतात ? कोणाचं किती डोकं दुखत? कोणाची किती मळमळ होते? किती चिडचिड होते ? किती पिंपल्स येतात ? पपई -खजूर -हळद दूध घरगुती कोणते उपाय किती करायचे ? किती गरम पडायचे ?" याची तासनतास पुरुष घरी नसताना चर्चा करायच्या. याचमुळे नेमकं मासिक पाळीत स्त्रीची मानसिक आणि शारीरिक नेमके काय बदल होतात. स्त्रीला किती त्रास होतो या गोष्टी कधी पुरुषांपर्यंत पोहचतच नाही.

नेमके सणवाराला त्या घरातील स्त्रीला पाळी आली तर आजही "अडचण झाली, प्राब्लेम झाला , विघ्न आले" असे शब्द आज हि सर्रास वापरले जातात. "घरातील आता सर्व सणवारातील काम कोण करणार ?" यामुळे घरातील इतर स्त्री आणि पुरुष यांची चिडचिड आणि टेन्शन वाढत. आज हि हे चित्र आमच्या गावातील आणि शहरातील प्रत्येक नातेवाईकाच्या घरी हमखास बघायला मिळते.

मासिक पाळीतील ५ दिवस वेगळे ठेवणे यासाठी काही सुशिक्षित मैत्रिणी वकिली करत पुढाकार घेऊन बोलतात कि, "स्त्रीला आराम मिळावा म्हणून ते दिवस वेगळे ठेवतात." तिला आराम मिळावा म्हणून अस्पृश्य ठेवण्याची का गरज भासते? समावेशन करून हि तिला आराम देता येऊ शकतो. इतकं साधी गोष्ट हि लक्षात येत नाही.

सध्या मी मेट्रो सिटी मध्ये राहते. माझ्या ऑफिसचे कर्मचारी आज हि "अडचण / प्रॉब्लेम आला..किंवा येणार .. आता घरातली सणवारची पूजेची काम कशी होणार ? " याच चर्चा सुरु असतात.

It's Time for Action... मासिक पाळी बद्दलचे संस्कृती- परंपरेच्या नावाने नकारात्मक असेलेली विचार सरणी पण बदलूया. प्रत्येकाने पुढाकाराची बदलाची गरज आहे..
कारण,
ती आजही मासिक पाळीला प्रॉब्लेम / अडचण / बर्थडे / पगार असे कोडवर्ड वापरते.
कारण,
तिने मासिक पाळी शब्द वापरला तर ती चारित्र्यहीन म्हणून तिला पाहिले जाते.
कारण,
ती आजही तिच्या मासिक पाळीतील कपडे लपवूनच सुकवते.
कारण,
ती आज हि सणवारा आणि समारंभात घरात काम करता यावे म्हणून किती हि वेदना झाल्या तरीही मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेत असते.
कारण,
तिला आज हि गावा-गावांत मासिक पाळीच्या दिवसात तिला अस्पृश्यासारखी वागणूकी दिली जाते.
कारण,
आज हि तिची मासिक पाळी अपवित्रच आहे.
कारण,
तुमच्या घरातील "ती" तुमची आई, बहीण, पत्नी, काकी, मामी किंवा मैत्रीण कोणीही असू शकते. जर लेख वाचणारी स्त्री आहे तर तुम्ही स्वतः देखील असू शकाल ?

मासिक पाळीदेखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. इतकं सोपं आहे समजून घ्यायला. पण उगीच रूढी - परंपरा पाप -पुण्य संस्कृती वैगरे जोखड त्यावर टाकत गेले आहेत.

नुसते Menstrual Hygiene Day 2024 चा स्टेट्स ठेवण्या पेक्षा तिला तिच्या मासिक पाळीला समजून घेणायचा प्रयत्न करूया.

अज्ञान, समज - गैरसमज असतील तर मोकळ्या मनाने चर्चा करूया.
मी चर्चेसाठी तयार आहे माझ्याशी नक्की बोलू शकता. तुम्ही तयार आहात का ?

#MenstrualHygieneDay
#menstruationmatters

✍🏻Anjali Pravin यांच्या फेसबुक वॉल वरून

3 weeks, 2 days ago
3 weeks, 2 days ago

एक स्त्री लहान बाळाला घेऊन धावत येते. सोबत आरडा ओरडा करत रडणारी एखाददुसरी बाई आणि एखादा पुरुष असतो. साधारणपणे पहाटे पाच ते सकाळी आठच्या दरम्यानची वेळ असते. एखाद दोन दिवसाआड अशी केस दवाखान्यात येतेच. सगळ्या केसमध्ये कमीजास्त प्रमाणात घटनाक्रम सारखाच असतो.
बाळाचं वय साधारणपणे सहा महिन्यांच्या आत असतं, थोडंफार कमी जास्त! कुटुंब घाबरलेलं असतं... बाळाची हालचाल होत नसते, शरीर थंड पडलेलं असतं, काळंनिळं झालेल असतं. नाडी लागत नाही, डोळ्याच्या बाहुल्या प्रसरण पावलेल्या असतात, ECG काढला जातो... रेषा सरळ येते...‌
ते बाळ जिवंत नसतं!
बाळाच्या आईला, वडिलांना ही गोष्ट सांगणं म्हणजे... फार वाईट असतो तो सगळा अनुभव. सुरूवातीला धीर होत नाही पण शेवटी सांगावंच लागतं. कालपर्यंत ठणठणीत असणारं, छान खेळणारं, ताप नाही, कसला आजार नाही. शांत झोपलेलं बाळ नेमकं आज का उठलं नाही?
ती आई आपलं बाळ जिवंत नाही हे मान्यच करत नाही!
काही वेळ गेल्यानंतर एक प्रश्न आम्ही त्या आईला किंवा नातेवाईकांना विचारतो की,
'पहाटे बाळाला दूध पाजवलं होतं का?'
त्यांचं उत्तर 'हो' असतं!
पुढे तुम्ही जे वाचणार आहात ते फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला कळावं म्हणून शक्य होईल तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. होतं असं की, लहान बाळाला दूध अधूनमधून पाजवत राहावं लागतं. दूध ओढताना काही प्रमाणात हवा सुद्धा बाळाच्या पोटात जाते. ही हवा बाहेर काढणं आवश्यक असतं.
डॉक्टरांनी अगदी बजावून सांगितलेलं असतं की, दूध पाजवल्यानंतर बाळाच्या पाठीवर थाप मारून ढेकर काढायचा. बाळाने ढेकर दिल्याशिवाय झोपी घालायचं नाही. अडकलेला ढेकर बाळला अस्वस्थ करत असतो, ती हवा पोटातल्या अन्नाला वरच्या भागात ढकलत असते.
दुर्दैवाने चारशे- पाचशे बेबीपैकी एखाद्याची वेळ खराब असते. साधारणपणे पहाटे अशी केसे घडते. दिवसभर थकून गेलेली आई पहाटे झोपेत असते, गुंगीत असते. बाळाला दूध पाजवून तशीच झोप लागते, ढेकर निघत नाही... पोटातलं दूध फुफ्फुसात जातं! झोपेत तडफडून मृत्यू होतो, कोणाला कळतही नाही.
एखाद्या केसमध्ये कधी कधी कंटाळा करून बाळाला मांडीवर न घेता झोपूनच दूध पाजवलेलं असतं. त्याचेही परिणाम असेच वाईट होऊ शकतात. कधी कधी आई झोपेत असते, बाळाला किती दूध प्यायचं हे कळत नाही. पोट भरलं तरी पिणं सुरूच असतं... पोट गच्च भरुन श्वासनलिकेमध्ये दूध जातं. बाळ काळं निळं पडतं... मृत्यू होतो!
सकाळी आई उठून आपल्या कामाला लागते, बाळ पलंगावर झोपलेलं असतं. बराच वेळ होतो, नेहमी हालचाल करणारं लेकरू आज शांत का म्हणून जवळ जाऊन बघते... शरीर थंड असतं! रडारड सुरू होते आणि सुरूवातीला सांगितलेली कहाणी सुरू होते!
या सर्व गोष्टीत त्या बिचाऱ्या आईची काही चूक नसते. असं काही घडू शकतं याची खरंतर माहितीच नसते, कोणी सांगितलेलंच नसतं. एवढ्या भयंकर गोष्टीबद्दल आपल्या समाजात काहीही जागरूकता नाही हे दुर्दैव आहे. डॉक्टर सांगतात ढेकर काढा पण कधीतरी मृत्यूही होऊ शकतो एवढंही स्पष्ट सांगत नाहीत... सांगितलं पाहिजे, एवढ्या महत्त्वाच्या विषयावर जागरूकता झाली पाहिजे!
साधारणपणे जी छोटी कुटुंबं आहेत... जिथे नवरा, बायको यांच्याशिवाय शिवाय लहान बाळाकडे लक्ष द्यायला कोणी नाही त्या घरात अशा गोष्टी घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून म्हणतात घरात एकतरी म्हातारं माणूस असावं. ज्या घरात म्हातारी, अनुभवी बाई असते त्या घरात ही वेळ येत नाही... ढेकर काढल्याशिवाय ती बाळाला झोपूच देत नाही!
इमर्जन्सी विभागात काम करताना अशा केसमधील शेवटचा सर्वात कठीण टप्पा असतो पोस्ट मॉर्टम! मृत्यूचं कारण शोधण्यासाठी बाळाचं पोस्ट मॉर्टम करावे लागते आणि ही गोष्ट त्या आईला समजावून सांगणं फार फार कठीण असतं! कितीतरी प्रसंग बघितले कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली असते, डॉक्टर तयार असतात पण ती आई छातीला कवटाळलेलं बाळ सोडायला तयार नसते...
पोस्ट मॉर्टममध्ये फुफ्फुसात दुधाच्या छोट्या छोट्या गुठळ्या सापडतात.
अशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधीतरी झोपेत असताना चूकून आईच्या अंगाखाली बाळ येतं आणि गुदमरून मृत्यू होतो. म्हणून आईच्या आणि बाळाच्या मध्ये छोटी उशी वगैरे ठेवतात, अर्थात घरात कोणी जुणं जाणतं असेल तर या गोष्टी टाळता येतात.
माफ करा मी काही गोष्टी फारच स्पष्ट लिहील्या आहेत, भाषा अंगावर येणारी आहे. आपल्या आजूबाजूला असंही काही घडत असतं आणि ते कधीतरी आपल्या कुटुंबासोबत सुद्धा हे घडू शकतं हे आपल्यालाही कळावं म्हणून हा लेख. थोडी जागरूकता आणि एक जीव जरी वाचला तरी आनंद आहे.
Take care

डॉ. प्रकाश कोयाडे

2 months, 3 weeks ago
मनातील भावना..✍💌
2 months, 4 weeks ago

काही जागा, काही माणसं, काही वेळा बदलतात..पण काही माणसं आहे़त, जिथे आहेत तिथेच असतात. असं म्हणतात काळानुसार बदलायला हवं, जसा देश, तसा वेश अंगिकारायला हवा..पण हा सगळा अट्टाहास कशासाठी? कोणत्या विशिष्ट गोष्टीसाठी? आणि समजा जसं फिल्मी दुनियेत दाखवतात तसं खरचं प्रखर संघर्षानंतर गुडी गुडी हैपनिंग झालचं. तर त्याच्याही पुढे अशी कोणती गोष्ट मिळवायची असते की त्यासाठी माणुस नेहमी हपापलेला असतो. असा प्रश्न मला नेहमी छळतो.

मुळात सुखा-समाधानाची व्याख्या ती नेमकी काय? ती आपणच ठरवायची असते. आणि आपण सुखात आनंदात आहोत की नाहीत याचे मोजमाप करण्याचा अधिकार समाजाच्या हाती देणं म्हणजे मुर्खपणा आहे असचं वाटतं. सरकारी नोकरदारांना वाटते खाजगी नोकरी बरी. खाजगीवाल्यांना वाटते नकोच ती बॉसची कटकट सरकारी नोकरी असती तर कित्ती बरे असते. मैरिड लोकांना संसार म्हंजे तडजोड आणि आवडीच्या गोष्टींचा त्यागच वाटतो. अनमैरिडांना वाटते अरे माझे लग्न कधी होणार? मुलगी असणा-यांना वाटते मुलगा हवा होता..मुलगा असणा-यांना घरात लक्ष्मी हवीच म्हणुन मुलगी हवी असते..व मुलासाठी प्रॉर्पटी ऊभा करण्यासाठी त्यांना अख्खा जन्म घालवायची हौसही असते.

भलेही तो सो कॉल्ड वारस ऊद्या व्यसनी होऊन त्यांना लाथा का घालेना..! ह्यांना मुलाच्या लाथा हव्यात पण जावयाच्या हातचे पाणीही नको प्यायला. असो.(मला कध्धीच वाटतं नाही बरे..ऊलट अभिमान व गर्व प्रसंगी माजही वाटतो..मुलगी असल्याचा)
जॉबवाल्या लेडीजला वाटते काश..मी हाऊसवाईफ असते..मस्त लोळले असते घरीच. ( आता हाऊसवाईफ म्हंजे बिनपगारी फुल अधिकारी असते. जिच्या कामाचे मोल पैशांत काय कुठल्याच मौल्यवान गोष्टीत होऊ शकत नाही) हाऊसवाईफला वाटते माझी स्वत:ची कमाई असती तर..मी माझी सगळी स्वप्नं पुर्ण करु शकले असते.

अर्थात कोणत्याही स्त्रीने आर्थिक स्वावलंबी असावेच पण एकावेळी एकच गोष्ट जमणारा पण महिलावर्ग आहेच. श्रीमंतांना समाधानाची झोप हवी आहे..गरीबांना श्रीमंतांसारखे व्हावे वाटते. तर सांगायचा मतितार्थ असा..
सुखाची समाधानाची व आनंदाची कुणाचीच व्याख्या परफेक्ट नाहीय. त्यामुळे हे शोधण्यात जिंदगीतला वर्तमानकाळ व्यर्थ घालवण्यात काहीच पॉंईंट नाही. मी कित्येक म्हातारी माणसं पाहतो..पश्चातापाच्या आगीत होरपळत असतात.. मी अमुक केलं असतं तरं बरं झाल असत. मी तमुक करा़यला नको होतं. तेंव्हाच तो आनंद घ्यायला हवा होता वगैरे वगैरे..!

तर मित्रांनो..शेवटी सरणावरचे मरण चुकलेय कुणाला? त्यामुळे ध्येयामागे जरुर धावा. पण तुमच्या गरजा कोणत्या व किती याची मर्यादाही पाळा. आपला आनंद स्वत:वरच अवलंबुन ठेवायचा दुस-यांवर नाही हे एक छोटंस पथ्य पाळल की जगणं खरच थोडंका होईना सोप्प होईल..! शेवटी, रेतीसारख्या दुरवर पसरलेल्या आयुष्यातुन 'मोती' शोधायचा सुखकर प्रवास म्हणजेच खरं जगणं..!

# जगणं दुनियादारीतलं..

©️®️✍️शैलजा खाडे ❤️ शब्दशैली
कोल्हापुर.

@Shabdshailee

2 months, 4 weeks ago
मनातील भावना..✍💌
2 months, 4 weeks ago
मनातील भावना..✍💌
2 months, 4 weeks ago

. 🔴 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔴*🔥 *सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.*🔈*टेस्ट क्रमांक - 16 *🆕*💥* *एकूण प्रश्न : 30*💥 *Passing : 15* *Score लगेच समजेल.😍* *वेळ 15 मिनिट.*🔍*आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.*💯**💎Www.MpscCorner.com*▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇https://mpsccorner.com/general-knowledge-test-16/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-16/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-16/
🔖 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍**

3 months ago

📊 मराठी व्याकरण सराव टेस्ट *📊***

( हे सर्व प्रश्न ने TCS व IBPS ने विचारलेले आहेत ) *🛍 *एकूण प्रश्न - 30*🧠 *टेस्ट सोडवल्या नंतर तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील...*⭐️*अजून फ्री टेस्ट साठी भेट द्या.👇*✔️ Www.mpsccorner.com🔴 *खाली दिलेल्या लिंकवर Click करून आजची ही टेस्ट सोडवा 👇*https://mpsccorner.com/marathigrammartest-10
https://mpsccorner.com/marathigrammartest-10
https://mpsccorner.com/marathigrammartest-10
‼️ *आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा 👍****

3 months ago

परिचयातील एका मुलीची घटना आहे. वयाच्या अठराव्या वर्षी 27 वर्षे वयाच्या सजातीय कमावत्या देखण्या तरूणाशी तिने लग्न केले. इतक्या लवकर लग्न करण्यास तिच्या घरच्या मंडळींचा विरोध होता, तरीही तिने आत्महत्या करेन अशी धमकी देत मागे लागून लग्न केले. अर्थातच लग्न गाजावाजा न करता केले गेले. तिची नवलाई लवकर संपली नि त्याचे खरे स्वरूप समोर आले. तो सायको होता. तिला मारझोड करायचा, शिव्या द्यायचा आणि संशय घेऊन वाट्टेल ते बोलायचा. कधी कधी कोंडून ठेवायचा. तिने एक केले की त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले तरी मूल होऊ दिले नाही परिणामी तो अधिकच संशय घेऊ लागला.

तिच्या आईवडिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचली तेव्हा तिने आधी साफ नाकारली. असे काही होतच नाही, आमचा संसार सुरळीत आहे सुखात आहे अशी थाप मारली. मात्र तिचा हितचिंतक चांगला होता, त्याने तिचे काही व्हिडिओ तिच्या आईवडिलांना दाखवले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांनी तिला तत्काळ घरी परतण्यासाठी गळ घातली मात्र ती काही केल्या त्यास दुजोरा देत नव्हती. बळेच आपण सुखात असल्याची बतावणी करत होती. सासरी आपली बदनामी केली म्हणून त्याने तिचा अधिकच छळ सुरू केला.

तिचा भाऊ नि तिचे आईवडील त्याच्या घरी जाऊन चार गोष्टी बोलून आले मात्र काहीही फरक पडला नाही. या मुलीमुळे आपल्याला पनवती लागली असा अंधश्रद्धेचा ग्रह करून घेत त्याच्या घरातल्या सर्वच जणांनी तिचा छळ सुरू केला तरीही ती मुलगी त्याच्याविषयी तक्रार करायला तयार नव्हती.

मुलीच्या पालकांनी वकिलांचा सल्ला घेतला, त्यांनी सांगितलं की मुलगी सज्ञान असताना लग्न झालेय. शिवाय तिची काहीच तक्रार नाहीये, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्यांनी तिची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा सल्ला दिला. त्यात ते कमी पडले. तिने मनाचा ठाव काही केल्या लागू दिला नाही. कुणीतरी त्यांना माझे नाव सुचवले.

त्यांच्याशी आधी फोनवर बोलणे झाले. मग प्रत्यक्ष भेट झाली. मुलीशी त्यांनी फोनद्वारे ओळख करून दिली. तिच्याशी बोलणे झाले. तिला काही केसेसमधील माहिती हळूहळू पुरवत गेलो. त्या दरम्यान तिला सवालच केले नाहीत, पालक तिच्यावर नाराज आहे हे न दाखवता ती हे का करत असावी याचे अंदाज बांधणाऱ्या काही मुलींच्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या अशाच काही घटनांची माहिती तिला दिली.

मग कुठे ती बोलती झाली. मग ती समुपदेशनास तयार झाली. तिच्या शहरातील (कोल्हापूर) मानसोपचार तज्ञांशी तिची एक सिटिंग झाली, नंतर तिच्या माहेरच्या शहरी मानसोपचार तज्ञांशी तिच्या तीन सिटिंग्ज पूर्ण झाल्या. काल तिने त्याच्याविरोधात घटस्फोट मिळावा यासाठी अर्जावर सही केलीय.

तिला भीती कशाची होती माहिती आहे का?

आपण केलेली निवड चुकली हे कसे स्वीकारायचे या विचारापोटी ती ते नाते पुढे रेटत होती.
या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी आपण आई-वडिलांना रडवलं यांचे तिला शल्य होते.
आपण माहेरी परतलो तर लोक आपल्याला व आई-वडिलांना लोक नावे ठेवतील या न्यूनगंडाने तिला ग्रासले होते.
आपण माणूस ओळखण्यात कमी पडलो हे तिला समजले होते पण ते मान्य करणे म्हणजे सर्वांनाच कमीपणा असा तिचा समज झाला होता.

मानसोपचारतज्ज्ञांनी तिला सांगितले की ती ज्या वयात लग्नासाठी इरेला पेटली होती तेव्हाचे वय आणि मानसिक अवस्था पाहू जाता तिला ते जमलेच नसते.

आधी केलेली चूक दडपून नेण्यासाठी आयुष्यभर चुकांची मालिका सुरू ठेवण्यापेक्षा नकळत झालेली चुक मागे टाकून आयुष्याकडे पुन्हा नव्याने पाहणे इष्ट हे तिला पटले.

समाज, लोक, दुनियादारी यापेक्षाही मोलाचे आहे ते स्वतःशी प्रामाणिक राहणे हे तिच्या मनावर ठसले तेव्हा ती वास्तव स्वीकारून दोन पावले पुढे आली.

तिला तुमच्या सदिच्छा हव्यात. आशीर्वाद हवेत.
मुलगी, बहिण, मैत्रीण समजून!

चुकलेल्यांवर रागावू नये, त्यांना घराची दारे बंद करू नये. त्यांना समजून घ्यावे. परिस्थिती बदलायला वेळ लागतो पण संयम कामी येतो.
जग नावेच ठेवत असते, आपल्या वाटा आपल्यालाच धुंडाळायच्या असतात!

- समीर गायकवाड.

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month ago

Last updated 1 month, 3 weeks ago